बागडण्याच्या मस्ती करण्याच्या वयात “ती” करतेय आई – वडीलांची सेवा

0
332
बातम्या शेअर करा

संगमेश्वर – ( विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील आरवली येथील मुंबई – गोवा महामार्गावर एका चहाच्या टपरीवरील छकुली आपल्या पित्याचा आधार बनली आहे ज्या वयात काॅलेजची मस्ती अनुभवायची , मित्र , मैत्रिणीसोबत बागडायचे त्याच वयात छकुलीवर आपल्या कुटुंबाला आधार देण्याची वेळ आली आहे एकुलता एक भाउ रस्ते अपघातात गेला तर वडील प्रकृती ठिक नसल्या कारणाने घरी असतात असा परीस्थितीत छकुली आपली जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडत आहे  मात्र छकुलीच्या या कष्टाला ग्रहण लागले ते मुंबई – गोवा महामार्गाचे ती ज्या ठिकाणी चहाची टपरी चालवते ती जागा ग्रामपंचायत कार्यालयाच्या क्षेत्रात आहे. छकुलीची चहाची टपरी आता मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणात जात असल्याने छकुलीच्या समोर आई – वडीलांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्ग चौपदरीकरणात जात असलेल्या या टपरीचा मोबदला मिळावा म्हणून छकुली कासावीस आहे वडील आजारी असल्याने त्यांना पाठपुरावा करणे शक्य नाही चिमुकली  छकुली शासनाकडे जाणार तरी कुठे ? तीच्या टपरीचा मोबदला मिळावा म्हणून छकुलीने ९ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांच्या पाहणी दौ-यात विनंती केली.

आरवलीत अनेक टप-यांना ग्रामपंचायतीने अधिकृत दर्जा दिला आहे त्या टप-यांना करपावती , असिसमेंट लागू करण्यात आला आहे या अधिकृत टप-यांना मोबदला देय असल्याने छकुलीच्या टपरीला ग्रामपंचायतीने अधिकृत करावे अशी विनंती केली मात्र शासनाच्या निर्बंधामुळे ग्रामविस्तार अधिका-यांनी छकुलीची टपरी अधिकृत करण्यास स्पष्ट शब्दत नकार दिला तांत्रिक कारणात अडकलेल्या छकुलीला न्याय मिळेल का एवढाच प्रश्न मनात कायम घोंगावत असतो विविद्य स्तरावरुन अनेक जनांना मदत केली जाते मात्र कमी वयात आपल्या आई – वडीलांची जबाबदारी समर्थपणे पेलणा-या या छकुलीसाठी कोणी पुढाकार घेईल का ?आरवली येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र कुळ्ये हे एकेकाळी आरवली गावातील शिवसेनेचे प्रमुख नाव एक प्रामाणिक राजकारणी त्यांच्या नावाचा आदर ,सन्मान केला जात होता तो आज ही कायम आहे मात्र सध्या त्यांची चौफेर बाजुने कोंडी झाली आहे त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या छकुलीवर येवून ठेपली आहे राजेंद्र कुळ्ये हे तसे ट्रक चालक होते त्यांच्या मालकीचा स्वताचा ट्रक आहे मात्र सध्या प्रकृती ठिक नसल्याकारणाने चालकाचे काम थांबवावे लागले आहे त्यातच प्रकृती साथ देत नसल्याने एखादा व्यवसाय तरी कसा करणार अशा परीेस्थितीत वावरताना त्यांनी दोन वर्षापुर्वी आरवली येथील महामार्गालगत चहाची टपरी सुरु केली ते सरपंच असताना त्यांनी या चहाच्या टपरीला ग्रामपंचायतीमधून असिसमेंट मिळवून दिला असता मात्र आपण एक जबाबदार नागरीक असताना आपण नियमबाह्य काम करायचे नाही असा निर्धार असलेल्या राजेंद्र कुळ्येंवरच सध्या उपासमारीची वेळ आली आहे महामार्गावर सुरु असलेल्या चहाच्या टपरीचा मोबदला मिळवण्यासाठी या कुटुंबाचा संघर्ष सुरु आहे टपरीद्वारे आपला उदारनिर्वाह  करणा-या या कुटुंबाला आता महामार्ग चौपदरीकरणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.राजेंद्र कुळ्ये यांना दोन अपत्ये एक मुलगा व एक मुलगी मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला  मुलगी म्हणजेच  छकुली  आज हीच छकुली कुळ्ये कुटुंबाची आधार बनली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here