12 रोजी पुणे येथे प्रोटान संघटनेचे ७ वे राज्यअधिवेशन

0
4
बातम्या शेअर करा

गुहागर – प्रोटान संघटनेचे ७ वे राज्य अधिवेशन पुणे येथे पार पडणार असून या अधिवेशनानिमित्त राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटान संघटनेचे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. या अधिवेशनात शैक्षणिक व सामाजिक कार्यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदेश कदम रत्नागिरी जिल्हा प्रोटान यांनी दिली.

पुणे येथे १२ ऑक्टोबर रोजी हे अधिवेशन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ, होणार आहे. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अशोक पांडुरंग पाष्टे शाळा- पालपेणे यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कामगिरी दखल घेऊन यांना “राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील जि.प.शाळा कडवई तांबडवाडी या शाळेतील आदर्श शिक्षिका सुलभा संदेश कदम यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात व कला क्रिडा अशा विविध क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील रणजित रविंद्र पवार यांना शिक्षण आणि कर्मचारी क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या कामगार नेते नारायण लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिवेशनात रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पुणे येथे आयोजित राज्य अधिवेशनात वि‌द्यार्थी, शाळा तसेच शिक्षक यांच्या समस्यांवर तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या खाजगीकरण, संचमान्यता, समूहशाळा या अन्याय धोरणा विरोधात सविस्तर चर्चा होणार असून या अधिवेशनासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार किरण सरनाईक , राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम – प्रा. गोरखनाथ वेताळ, डॉक्टर मगन ससाने, डॉ. प्रा. संजय धाबर्डे , प्रा. डॉ. मोहन मिसाळ , प्राध्.पी. बी लोखंडे , प्रा. सुचित्रा खोब्रागडे , प्राध्. डॉ. राजेंद्र ढवळे , गजानन उल्हे आणि सदाशिव वारे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.शिक्षणाचे खाजगीकरण, शिक्षण व्यवस्था संपवण्याची प्रक्रिया व कामगार विरोधी कायदे इत्यादी अन्यायकारक धोरणाच्या विरोधात काय‌द्याच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने संघटित, सक्षम आणि निर्णायक लढा उभारण्यासाठी सर्व कर्मचारी वर्गाने एकत्र येणे आवश्यक असल्यामुळे या जागृती मोहिमेस तन-मन-धनाने सहकार्य करून सहभागी व्हावे असे आवाहन माननीय जिल्हाध्यक्ष संदेश कदम यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here