“जनता विद्यालय आंगवली” येथील रणजित पवार यांचा राज्यस्तरीय सन्मान

0
31
बातम्या शेअर करा

पुणे – राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS).प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विंग PROTAN यांच्या ७व्या राज्यस्तरीय अधिवेशनात
कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने संगमेश्वर तालुक्यातील जनता विद्यालय आंगवली येथील रणजित रविंद्र पवार यांचा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.पवार हे शाळेतील शिस्तप्रिय, कार्यतत्पर व सामाजिक बांधिलकी जोपासणारे कर्मचारी म्हणून परिचित आहेत.
ते शाळा, समाज आणि शिक्षण क्षेत्रासाठी नेहमीच सक्रिय राहून विविध उपक्रमांद्वारे प्रेरणादायी कार्य करीत असतात.त्यांच्या कार्यतत्परतेची आणि प्रामाणिकतेची दखल घेत राज्यस्तरावर त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल परिसरातून, सहकाऱ्यांकडून आणि शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here