
चिपळूण – चिपळूणमध्ये काल शुक्रवारी मुसळधार पाऊस पडत होता. शहरातील विविध भागात पाणी साचले होते. वाशिष्टी व शिव नदीला पूर आला होता. यावेळी महामार्गा लगत असलेल्या सर्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाणी घुसले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. रात्रीपासून कर्मचाऱ्यांकडून साफसफाई सुरू करण्यात आली आहे.शहरात विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. पाणी मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असणाऱ्या या सार्वजनिक बांधकाम विभागात कस घुसलं पाणी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
काल रात्रीपासून कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे वाचवण्याचा प्रयत्न केला. आज शनिवारी सकाळपासून या ठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.संपूर्ण साफसफाईसाठी अजूनही एक दिवस लागण्याची शक्यता आहे.