पालघर -ठाणे जिल्ह्यातील बोईसर येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार यांना नुकतेच राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
आनंदराव पवार हे पोलीस खात्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे 1989 साली भरती झाले. त्यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली ,खेड ,गुहागर चिपळूण,मंडनगड, अलोरे तसेच ठाणे व शहापूर अशा या सर्व परिसरात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत दमदार अशी कामगिरी केली आहे. या परिसरातील त्यांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सर्वसामान्य नागरिकांबरोबर मिळून मिसळून काम करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत सध्या ते पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. नुकतेच त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या आधी त्यांना आपल्या दमदार कामगिरीमुळे पोलीस महासंचालक यांच्यावतीने दमदार कामगिरी केल्यामुळे विशेष पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यात आता त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात आपण या सेवेसाठी सर्वोत्तम कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.