चिपळूण – चिपळूण-कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पुलाचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून त्यामुळे हा मार्ग मोठ्या व अवजड वाहनांसाठी २२ जून २०२५ पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
चिपळूण कराड या मार्गावरून लहान व हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करु शकणार नाहीत.
कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा, तर पुण्याकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी भोर घाट किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहनही लिगाडे यांनी केले आहे.
या दुरुस्तीमुळे काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था बदलली असून वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.