कराड – कराड चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अखेर 48 तासाने सुरू करण्यात प्रशासनाला यश आले.
दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने कराड आणि चिपळूण ला जोडणाऱ्या महामार्गाचा वाजेगाव येथील रस्ता पाण्याने वाहून गेला. त्यामुळे या पर्यायी मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प होती. अखेर याच वाहून गेलेल्या रस्त्याच्या शेजारी नव्याने जो पूल बांधण्यात आला होता. त्या पुलाचे रात्रंदिवस काम करून तो नवीन फुल वाहतुकीस सुरू करून वाहतूक सुरू करण्यात आली. यासाठी प्रशासनाने तब्बल 48 एवढे तास वाट पहावी लागली . या सर्व रस्ता बंद असलेल्या दरम्यान मात्र या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहन चालकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. गेली अनेक वर्ष हा रस्ता दुर्लक्षित आहे त्यामुळे आता तरी हा लगता लवकर पूर्ववत होईल का किंवा प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.