बातम्या शेअर करा

चिपळूण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख ना. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्ण कल्याण समिती प्राथ.आरोग्य केंद्र दादर यांच्या वतीने कोविड योध्दा सन्मान कार्यक्रम करण्यात आला.या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत वैदयकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका यांना यावेळी गौरवण्यात आले.
दादर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रूग्णकल्याण समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती विनोद झगडे, पंचायत समिती सदस्य गटनेते राकेश शिंदे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सोळवंडे, विश्वनाथ सकपाळ आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी कोरोनाच्या काळात स्वतःची अथवा आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सर्व योध्दा कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. जि.प. सदस्य श्री विनोद झगडे यांनी जगातील महासत्ता असलेल्या देशापेक्षा आपल्या सर्व आरोग्य व इतर कर्मचाऱ्यांनी या कोरोनाला चांगला पायबंद घातल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविका,आशा यांनी अत्यंत तुटपुंज्या पगारात देखील अहोरात्र सेवा करून आदर्शवत काम केले. आपल्या सर्वांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगुन हा सुत्य उपक्रम आयोजित केल्याबदल पं.स. सदस्य राकेश शिंदे यांना धन्यवाद दिले. यावेळी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा, या सर्वाना सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले. सोशल डिस्टन्सीग पाळून हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र मोळाज यांनी केले.

हा सन्मान आमच्या कुटुंबाचा -सौ तांबट यावेळी बोलताना आशा सेविका वैष्णवी तांबट यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या महामारीच्या काळात आम्ही खंबीरपणे लढलो ते आमच्या कुटुंबाच्या पाठबळावर. कुटुंबाने आम्हाला पाठबळ दिलं, समजून घेतलं सहकार्य केलं त्यामुळे आम्ही हि लढाई लढू शकलो त्यामुळे आजचा हा सन्मान खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here