दापोली ; तलाठ्याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
124
बातम्या शेअर करा

दापोली – उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता 20 हजारांची लाच मागणाऱ्या सजा केळशी, अतिरिक्त कार्यभार मांदिवलीचे ग्राममहसूल अधिकारी (तलाठी )राजेंद्र उंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे, सजा केळशी अति. पद‌भार मांदीवली यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयांची मागणी करून त्यानुसार मागणी केलेली लाच रक्कम 20 हजार रुपये ग्राम महसूल अधिकारी उंडे यांनी आज पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र उंडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अविनाश पाटील पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्यासह सहाय्यक फौजदार चांदणे, संजय वाघाटे, विशाल नलावडे,श्रेया विचारे , दीपक आंबेकर, हेमंत पवार ,राजेश गावकर , समिता क्षीरसागर ,प्रशांत कांबळे आदींनीही कामगिरी पार पाडली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here