१३ जून रोजी नुतन पोलीस अधीक्षक विनीत बगाटे यांचा चिपळूणवासीयांशी संवादाचा कार्यक्रम

0
78
बातम्या शेअर करा

चिपळूण – नुकतेच पदभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक विनीत बगाटे यांच्याशी संवाद साधण्यासाठी शुक्रवार, दिनांक १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘बाळासाहेब माटे सभागृह’, कापसाळ, चिपळूण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सर्व समाजातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी बांधव, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने असून त्यांच्यासह फुलचंद मंगडे (पोलीस निरीक्षक, चिपळूण), आवासे पाटील (सहायक पोलीस निरीक्षक, साखर पो.ठाणे), आणि भरत पाटील (सहायक पोलीस निरीक्षक, अलोरे शिरगाव पो.ठाणे) हेही उपस्थित राहणार आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here