चिपळूण – गेल्या दोन दिवसापासून चिपळूण शहरात फेरफटका मारताना अतिशय सुंदर आणि खुले रस्ते दिसत आहेत. नगरपालिकेने रस्त्यावर बसणाऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करून एक प्रकारे चांगलं काम केलंय. मात्र आता प्रतीक्षा आहे. ती याच नगरपालिकेने गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत आणि राजकीय लोकांना अनाधिकृत बांधकामासाठी ज्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटीसीच बांधकाम केव्हा पाडणार..? याची नाहीतर गरिबांना एक न्याय आणि श्रीमंत यांना एक न्याय हीच भूमिका कायमस्वरूपी ही नगरपालिका राबविणार का? या ठिकाणीही आपली भूमिका चोक बजावणार याकडेच सर्वच चिपळूण वासियांचं लक्ष लागून राहिले आहे.
चिपळूण नगरपालिकेने गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमण हटाव ही जी लोकांची मागणी होती किंवा ज्या काही तक्रारी होत्या. त्याबाबत पुढाकार घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढून चिपळूण शहराला मोकळे गेले. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून चिपळूण शहरातून फेरफटका मारत असताना चिपळूण शहर अतिशय सुटसुटीत आणि अतिक्रमण मुक्त असं दिसत आहे. या कामगिरीमुळे चिपळूण नगरपालिकेचे अभिनंदन व कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशाच प्रकारे चिपळूण नगरपालिकेने गेल्या दोन तीन वर्षात बिल्डर ,स्थानिक राजकीय नेते , काही व्यापारी यांच्या अनधिकृत बांधकामावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी आता त्यानिमित्ताने पुढे येते.याच चिपळूण नगरपालिकेकडे अनेक राजकीय नेत्यांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे ,सर्वसामान्य नागरिकांचे अतिक्रमण ज्या ठिकाणी झाले त्याबाबतचे अर्ज दाखल आहेत. त्या अर्जांवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. कारण ज्यांच्या विरोधात अर्ज आलेत ते श्रीमंत आणि राजकीय लोक आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे रस्त्यावरील अतिक्रमण काढताना कुणाचीही तमा न बाळगता चिपळूण शहर अतिक्रमण मुक्त केलं. तशाच प्रकारे चिपळूण शहरातील जे अनाधिकृत बांधकाम झाली आहेत. ती ही अशीच अतिक्रमण मुक्त करावीत अशी मागणी त्या निमित्ताने जोर धरत आहे…. चिपळूणचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी आता रस्त्यावरील अतिक्रमणासारखेच या श्रीमंत अतिक्रमणावरही कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्यतून होत आहे.