मार्गताम्हाणे – गुहागर – चिपळूण मार्गावरील मार्गताम्हाणे येथे लावण्यात आलेल्या या अनोख्या बोर्डने सध्या सर्वच वाहन चालकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर याच बोर्डामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
चिपळूण ; त्या कारवाईबाबत नगरपालिकेचे अभिनंदन.. मात्र आता यांच्यावर कारवाई कधी..?
गुहागर – चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे 2019 साली रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू झाले. आज 2025 उजाडलं तरी अद्यापही काही ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं नाही. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं नाही. त्या ठिकाणी गेल्या तीन ते चार वर्षात अनेक अपघातही झाले. काही जणांचे जीवही गेले. मात्र असं असलं तरी ज्या ठिकाणी अपघात होतात त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि त्या खात्याचे संबंधित अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. परिणामी अशा ठिकाणी अजूनही अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष द्यावे व संबंधित ठेकेदाराला आणि संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी पक्का रस्ता बनवायला सांगावा या मागणीसाठी या ठिकाणी एक बोर्ड लावला आहे. आणि त्या बोर्डवर ‘सावधान येथे तुमच्या मृत्यूची जय्यततयारी ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी केली सौजन्य यमदूत” अशा नावाचा बोर्ड या ठिकाणी लावला आहे. सध्या हा बोर्ड चर्चेत विषय बनला आहे. आता तरी संबंधित ठेकेदाराने अधिकारी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता व्यवस्थित करतील का.? याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर- चिपळूण मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून केली जात आहे.