गुहागर ; झोंबडी परिसरात रात्री येणार तो भयानक आवाज कसला..?

0
915
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्री अकरा ते एकच्या दरम्यान विचित्र असे आवाज येत असल्याने हे नक्की आवाज कशाचे आहेत. याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. काही जणांचे असं म्हणणं आहे. की या परिसरात शिकारीसाठी आलेल्या बंदुकीच्या गोळीचा आवाज आहे. तर काहीजण असं म्हणत आहेत की या परिसर रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग केल्याचे आवाज असू शकतो त्यामुळे सर्वसामान्य जनता हे घाबरून गेली आहे.

झोंबडी पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये माळरान आहे. याच माळरानावरून हा आवाज येत आहे. पंचक्रोशीत देवघर , गिमवी मढाळ, सुरळ , आधी गाव येत आहेत. रात्रीच्या वेळेला सर्वत्र सामसूम असताना अशाप्रकारे मोठ्याने एखादा बॉम्ब फुटावा असा आवाज येत असल्याने या परिसरात घबराट पसरली आहे. तर काही जणांच्या मते या परिसरात गेल्या दोन दिवसापासून शिकारीसाठी रात्रीच्या गाड्या फिरताना दिसून येत आहेत. तर जे जुने जाणते लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या परिसरात कुठल्यातरी माळरानावर ब्लास्टिंग चे काम सुरू असल्याने त्याचा आवाज येत आहे. तरी संबंधित यंत्रणेने आणि पोलिसांनी याबाबत सखोल तपास करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी त्या निमित्ताने जोर धरू लागली आहे तसेच अशा प्रकारे रात्रीच्या वेळी जे कोणी काही कृत्य करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here