गुहागर ; कै. रवींद्र नाटेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मच्छीमार समाजाचा भव्य मोर्चा

0
264
बातम्या शेअर करा


गुहागर – कै. रवींद्र नाटेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मच्छिमार समाजाचा भव्य मोर्चा आज गुहागर येथे काढण्यात आला.यावेळी खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या समस्यांबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी ,रायगड जिल्हा तर्फे गुहागर तालुका खारवी समाज समिती गुहागर यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये खारवी समाजातील ६ हजारहून अधिक महिला पुरुषांचा सहभाग होता.


खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी रायगड जिल्हा तर्फे गुहागर तालुका खारवी समाज समिती गुहागर यांच्यावतीने तहसीलदार यांना यावेळी निवेदन देण्यात आले. खारवी समाज समिती तालुका गुहागर यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुहागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुहागर पोलीस परेड ग्राऊंड पर्यंत साधारणपणे ६ हजारहुन अधिक खारवी समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते. गुहागर पोलीस परेड ग्राऊंडवर सभा घेण्यात आली. व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २८/१०/२०२४ रोजी मौजे साखरी आगर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील एक गरीब मच्छीमार स्वर्गीय रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणारे जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला व निर्घृण हत्या करून त्यांना यमसदनी पाठवण्याचा अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणारी घटना घडवून आणली. तसेच मासेमारी नौकेतील जाळीसह नौकेलाही पेटवून देऊन नौका मालकाचे सुमारे दोन ते सव्वा दोन कोटीचे नुकसान केले आहे. अशा या पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला तथा नरभक्षकाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, संबधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच नराधमासह घटनेच्यावेळी उपस्थित बोटीवरील असणाऱ्या इतर खलाशांचीही निःपक्षपातीपणे चौकशी करून पोलीस तपास करण्यात यावा. कारण सदर घटना प्रत्यक्षदर्शी घडत असताना बोटीवरील उपस्थित अन्य खलाशांनी कोणताही प्रतिकार केला नाही, याचा अर्थ सदरची हत्या सर्वांच्या संगनमताने झाली असावी असा संशय आहे. त्यामुळे त्यांनाही सह आरोपी करण्यात यावे. अशा मागण्या असलेल्या निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.यावेळी खारवी समाज समिती तालुका गुहागर अध्यक्ष महेश नाटेकर, खलाशी संघटना अध्यक्ष सिताराम पटेकर, खारवी समाज समिती उपाध्यक्ष श्रीधर नाटेकर, नंदा रोहीलकर, कार्याध्यक्ष मारुती होडेकर, सहसचिव चैतन्य धोपावकर, मर्तंड नाखवा व विश्वनाथ म्हात्रे करंजा रायगड, अखिल महाराष्ट्र मच्छिमार महासंघ उपाध्यक्ष विष्णू नाटेकर, सागरी मच्छीमार अध्यक्ष ढामु अण्णा लोकरे, अनिल जाक्कर, प्रेरणा शिरगावकर, मनविता अडुरकर, सुमती जाधव, दिपस्वी कटनाक, माधवी धोपावकर, रमेश जाक्कर, संतोष आगडे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ६ हजारहुन अधिक महिला पुरुष सहभागी झाले होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here