गुहागर – विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुहागर मध्ये घडल्याने सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येते आहे.याप्रकरणी संस्थाचालका सहीत चार ते पाच जणांविरोधात गुहागर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गुहागरमधील खरे-ढरे भोसले महाविद्यालयातील प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली यामध्ये
प्राध्यापक गोविंद सानप, अनिल हिरगुंड,निळकंठ भालेराव,आणि संतोष जाधव या चार प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली हे चारही प्राध्यापक संस्थेच्या आवारात येत असताना लागणाऱ्या कच्च्या रस्त्यामध्ये त्यांना थांबून ही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या महाविद्यालयाची विद्यापिठामध्ये तक्रार केल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे समजते. गुहागर पोलिसांनी
संस्था अध्यक्ष महेश भोसले , आणि अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.
विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनाच मारहाण झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा बॉम्बे युर्निव्हरसिटी अँण्ड काँलेज टीचर्स युनियन (बुक्टू) या संघटनेने तीव्र निषेध केला असून याबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना एक निवेदन देण्यात आले आहे व आपणास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.