चिपळूण – गेल्या एक वर्षापासून चिपळूण येथील बाजारपेठेत लोकांच्या मनात घर करून असलेल्या एम.डी. मार्टचे 19 डिसेंबर रोजी दुसऱ्या वर्षात पदार्पण होत आहे. यावेळी ग्राहकांची सेवा हेच आमचं वैशिष्ट्य आम्ही कायमस्वरूपी जपण्याचा प्रयत्न करू असे एम.डी. मार्टचे सर्वेसर्वा निसार मालाणी यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्र आणि बाजारपेठेत नावाजलेले असे हे मालाणी हे नाव सध्या गुहागर आणि चिपळूण तालुक्यात मालाणी या नावाने अनेक उद्योग आणि व्यवसाय सुरू आहेत. त्याच मालाणी ग्रुपचा हा एम. डी. मार्ट ….. गेल्या वर्षापासून चिपळूणकरांच्या सेवेसाठी तत्पर आहे. ग्रहउपयोगी वस्तू व नित्य नियमित लागणारे जीवनावश्यक वस्तू या योग्य किमतीत विकण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. एमडी मार्टने आपल्या या मार्ट मधून ग्राहकांना दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबवत ग्राहकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या याच एम.डी. मार्ट मधून 450 पेक्षा जास्त वस्तू या एकावर -एक फ्री विकल्या जात असून चिपळूण शहरातील पाच किलोमीटर परीसरात घरपोच सेवा देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे घाउक विक्रीही या ठिकाणी केली जात असल्याने ते चिपळूण परिसरात चर्चेत आले आहेत. चिपळूण बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एमडी मार्ट चा आज प्रथम वर्धापन दिन.

सध्या चिपळूण बाजारपेठेत या एम.डी. मार्टने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. याही पुढे ग्राहकांच्या सेवेसाठी आपण कायमस्वरूपी राहू असे एम.डी. मार्टचे मालक निसार मालाणी यांनी सांगितले