कराड – महापारेषण कराड मंडलीय आयोजित आंतर मंडलीय नाट्य स्पर्धा या स्पर्धेत स्थापत्य मंडल कोल्हापूर परिमंडलच्या पगला घोडा या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कोल्हापूर मंडल यांच्या नेटवर्क 24*7 या नाटकाने पटकावला तर कराड मंडलाचे कौस्तुभ भालघरे उत्कृष्ट अभिनय आणि कोल्हापूर स्थापत्य मंडलाच्या वैशाली कांबळे उत्कृष्ट अभिनेत्री यांना गौरवण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) महापारेषण कंपनीतील पाच जिल्हयातील कर्मचारी व अधिकारी वर्गाने या नाट्य स्पर्धेत तीन नाटक विविध मंडलांमार्फत सादर केली ती अतिशय उत्कृष्ट होती. वेगवेगळे विषय समाजापुढे मांडणारी होती. त्यामुळे या सर्वच नाटकातील कलाकारांचे मी अभिनंदन करतो. तसेच ज्यांना पारितोषक मिळाले त्यांनी याहीपेक्षा सुंदर काम करण्यासाठी कायम प्रयत्न ठेवा तर ज्यांना पारितोषिक नाही मिळाले त्यांनी याहीपेक्षा जोरदार तयारी पुढील स्पर्धेसाठी त्यांनी याहीपेक्षा जोरदार तयारी पुढील स्पर्धेसाठी करावं त्याचप्रमाणे या नाटकातून जी आपण ऊर्जा घेणार आहात त्याचा उपयोग आपल्या कामाच्या ठिकाणी करावा असे मनोगत सतिश चव्हाण यांनी केले.
या स्पर्धेमध्ये पुढील प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.
उत्तेजनार्थ…..
कलाकार
1- सुनिल बंडगले
2- प्रवीण पुजारी
3- पृथीराज सावंत
बालकलाकार
- विदा दुमनाके
निविदा दुमनाके
रंगभूषा/वेशभूषा…
1- सुनिता कुलकर्णी ,स्वाती भोसले,चित्रा शिंदे, (अबुटभर )
2 – दामोदर देशपांडे, प्रताप पाटील (पगला घोडा)
संगीत…
1- (अबुटभर ) चंद्रकांत भरमगुंडे, संदीप पाटील
2- (पागला घोडा ) अभय ढमाले ,अभिजित पाटील
प्रकाश योजना..
1- (अबुटभर ) श्रीकांत पुजारी, दत्तात्रेय बोबडे
2 – (पगाला घोडा )रणजीत पाटील ,अनुप रसाळ
नेपथ्य…
1 – राहुल दिंडे
2 – प्रशांत मोहन,सूनित काटकर
अभिनय लक्षवेधी (पुरुष)…
- जीवन कांबळे
अभिनय लक्षवेधी (स्त्री)…
- स्वाती घोलप

अभिनय (पुरुष)…
प्रथम – किस्तुभ भालघरे (अभुटभर )
दितीय – अमित कुलकर्णी
अभिनय (स्त्री)…
1 – वैशाली कांबळे ( पगला घोडा )
2 – श्रुतिका जाधव
दिग्दर्शक
1- संजय किंकर ( पागला घोडा )
2- अफताब खान ( नेटवर्क 24*7 )
नाटक निर्मीत
1- पागला घोडा
2- नेटवर्क 24*7
3- अभुटभर

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ सतिश चव्हाण संचालक, महापारेषण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ शिल्पा कुंभार, मुख्य अभियंता कराड ,नागसेन वानखेडे मुख्य महाव्यवस्थापक मुंबई, चिदाप्पा कोळी अधिक्षक अभियंता तथा नाटय सचिव कराड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तर या स्पर्धेच्या वेळी पर्यवेक्षक हर्षा बागल सांगली,संजय हळदिकर कोल्हापूर,भास्कर ताम्हणकर सांगली यांनी काम पाहिलं. तर या कार्यक्रमाचे आयोजन शिल्पा कुंभार, मुख्य अभियंता कराड परिमंडल यांच्या मार्गदर्शनाखाली चिदाप्पा कोळी, अधीक्षक अभियंता, प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता, श्रीकृष्ण नवलाखे अधीक्षक अभियंता, अशोक सागारे अधीक्षक अभियंता, संजय किंकर अधीक्षक अभियंता, राजेश केळवकर, सहा. महाव्यवस्थापक (विवले) ,प्रशांत चौधरी सहा. महाव्यवस्थापक (मास ) आदींसह अनेकांनी केले.