दिल्ली – यंदा दोनवेळा लांबणीवर टाकली गेलेली आयपीएल स्पर्धा दि. 16 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयपीएल कार्यकारिणीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली. अंतिम तपशील व वेळापत्रकावर संमतीसाठी आयपीएल कार्यकारिणी पुढील आठवडय़ात केंदीय मंत्रालयाची भेट घेणार आहे. पण, त्यापूर्वीच त्यांनी संघातील प्रँचायझींना या नियोजनाची रीतसर माहिती दिली असल्याचे सूत्रांकडून कळते.
यंदा या स्पर्धेचा प्रारंभ दि. 19 सप्टेंबर रोजी होईल आणि दि. 8 नोव्हेंबरपर्यंत ती चालेल. पूर्ण 51 दिवसांचा हा कालावधी असणार आहे. आम्हाला केंद्राच्या संमतीची अपेक्षा आहे’, असे पटेल वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.