गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर लोवेल येथे नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित मुंबई विद्यापीठ अंतर्गत उडान महोत्सव मध्ये पार पडलेल्या पथनाट्य स्पर्धेत गुहागरच्या खरे – ढेरे भोसले महाविद्याल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यने प्रथम क्रमांक पटकावला
या उडान महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील १६ निमंत्रित कॉलेज सहभागी झाले होते. गुहागरचे खरे- ढेरे भोसले महाविद्यालय यांनी पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर न्यू एज्युकेशन सोसायटीज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने लांजा दुसरा क्रमांक व तिसरा क्रमांक मोहिनी मोरारी मयेकर कॉलेज चाफे यांना मिळाला. यावेळी गुहागर कॉलेजचे समन्वयक प्रमोद आगळे व कांबळे यांनाही सन्मानित करण्यात आले. या पथनाट्यात गुहागर महाविद्यालयाचे यश साळवी ,आदित्य कदम,विक्रांत मोरे,स्वराज,मयेकर,सोहम खरे ,अर्थव वराडकर ,महालक्ष्मी शिंदे ,रिंकल आग्रे ,अर्पिता वाडे ,सानिया साटले ,समृध्दी घडवले,रसिका कांबळे ,शुभम कुरधूनकर
व कॉलेज सहकारी GS श्रमिक भाटकर , सहिल पावसकर आणि सौरभ विचारे आधी सहभागी झाले होते. तर कॉलेजचे अध्यक्ष अभिजीत हेगशेटे ,अजीवन अध्ययन विस्तार विभाग कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल जाधव ,डायरेक्टर बळीराम गायकवाड ,प्राचार्य संजना चव्हाण ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गुहागर कॉलेजने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांच्या सध्या सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.