गुहागर – (मंगेश तावडे )- राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गुहागर तालुक्यातील काळसूर -कौंढर येथे मात्र गेल्या पंधरा दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मात्र हे मृत्यू नेमके कशाने झाले याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरु आहे.
काळसूर- कौंढर हे गुहागर तालुक्यातील एक गाव या गावात जवळपास बाराशेच्या आसपास लोकसंख्या असून तब्बल बारा वाड्या या गावांमध्ये आहेत. या गावात गेल्या पंधरा दिवसांमध्ये तब्बल आठ जणांचा मृत्यू झालाय यामध्ये चार जण हे गुहागर तालुक्याच्या बाहेर मृत्यू पावलेले आहेत. मात्र त्यांचा अंतिम विधी करण्यासाठी ते या गावात आणले तर याच गावातील त्या चार मृत्युनंतर पुन्हा आणखीन चार जण मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हे मृत्यु नक्की कशाने झालेत असा प्रश्न याठिकाणी नागरिकांना पडला आहे.? याआधी कधीही पंधरा दिवसात आठ जण मृत्यू पावल्याची घटना या गावात घडली नव्हती अशी माहिती या गावचे ग्रामसेवक घेवडे यांनी दिली.
पंधरा दिवसात तब्बल आठ जण मृत्यू पावल्याची घटना आरोग्य प्रशासनाला समजतात आरोग्य प्रशासनाची एकच तारांबळ उडाली तात्काळ आरोग्य प्रशासनाने या गावात आरोग्य सर्वे करून कोरोनाची कोणती लक्षणे आहेत. का याची तपासणी सुरू केली आहे.याचवेळी खबरदारी म्हणून या गावातील सात जणांचा स्वाब घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठवला आहे. अशी माहिती गुहागर तालुका आरोग्य अधिकारी पंकज देशमुख यांनी दिली.
एकीकडे जर पंधरा दिवसात आठ मृत्यू झाले असतील तर हे मृत्यू येथील ग्रामपंचायतीने प्रशासनाला कळवले का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय तर काळसूर- कौंढर येथे गुहागर तालुक्याच्या बाहेर मृत्यू पावलेल्या चार व्यक्तीला गावांमध्ये अंत्यविधी करण्यासाठी आणले असता ते नक्की कशाने मृत्यू पावले याची चौकशी येथील ग्रामस्थांनी किंवा सरपंचांनी केली होती का ? अशी चर्चा आता अशी चर्चा आता सुरू आहे. जर राज्यात कोरोनाचे थैमान असताना गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचे अंतिम विधी त्याच गावात केले जातात. मात्र या ठिकाणी तब्बल चार जण हे गावाच्या बाहेर मृत्युमुखी पावले असताना त्यांचा अंत्यविधी या गावात कसा काय करण्यात आला ? अशी चर्चा या ठिकाणी सुरू असून प्रशासन आणि पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.जे 8 जण मृत्यू पावलेले आहेत त्यातील काही जण हे 50 वर्ष वया पेक्षा जास्त वयाचे आहेत.