अहमदाबाद- करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. वर्ल्ड कप-2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला.
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे.1987 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला होता. यानंतर ती 1999, 2003, 2007, 2015 मध्ये चॅम्पियन बनली होती.सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित असताना टीम इंडियाने 50 षटकांत 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने 141 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. मिचेल मार्श 15 धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 2 धावा केल्या.अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे. कांगारू संघाने विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले.या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद करून माघारी धाडलं होतं. वॉर्नर पाठोपाठ मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथने देखील पॅव्हेलियनची वाट धरली. इथून भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केलं होतं. मात्र ट्रेविस हेडचा डोक्यात काहीतरी भलतंच सुरू होतं. त्याने सुरुवातीला संथ खेळी करत डाव पुढे नेला. त्याला मार्नस लाबुशेनने चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाज एकीकडे विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात होते. तर दुसरीकडे हेड आणि लाबुशेनने एकेरी दुहेरी धाव घेत स्कोअर बोर्ड हलता ठेवला. दोघांनी मिळून मोठी भागीदारी केली. त्यामुळे हा सामना भारतीय संघापासून दूर गेला. या सामन्यात ट्रेविस हेडने १२० चेंडूत १३७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने त्याला साथ देत ५८ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.