गुहागर – काळ्या वाळूला बंदी असल्याने गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील चोरट्या वाळूचा भाव वधारला आहे. अशा मध्येच पालशेत मधील लाल वाळूच्या मागणीने जोर धरला आहे पालशेत येथीलच कोळपवाडी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये चक्क पालशेत समुद्रकिनाऱ्यावरील चोरट्या वाळूचा वापर केल्याचे समोर आले आहे याबाबत तक्रार होताच येथील तलाठ्यांनी पंचनामा केला मात्र तो पंचनामा गेला कुठे तो मुरला कुठे याचा शोध घ्यावा लागणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील चोरट्या वाळूला उपशाला कोणाचा आशीर्वाद आहे., गुहागर महसूल विभाग यांना याची माहिती आहे. का.? तक्रार होताच तलाठी सर्कल अधिकारी सक्रिय होतात. मात्र पुढे काय असा सवाल केला जात आहे. पालशेत कोळपवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेल्या तब्बल तीस लाखाच्या रस्ता कामामध्ये
संरक्षक भिंत व रस्ता असे काम सुरू झाले आहे. येथील उताराच्या रस्त्यावर संरक्षक भिंतीसाठी चक्क पालशेत येथील चोरटी लाल वाळू वापरली जात आहे. मोठ्या प्रमाणावर पडलेल्या लाल वाळूवर काँक्रेट मध्ये वापर केला जात असून याबाबत तक्रार होताच नाममात्र तीन ब्रासचा पंचनामा करण्यात आला आहे. सदर पंचनामा गुहागरच्या महसूल विभागात पोहोचला का याचे उत्तर मात्र आजही गुलदस्त्यात आहे.
क्रश वाळू चालू शकते- शाखा अभियंता योगेश थोरात
पालशेत मध्ये शासकीय कामातील संरक्षक भिंतीमध्ये वापरण्यात येत असलेल्या पालशेत समुद्र किनाऱ्यावरील चोरट्या लाल वाळू बाबत सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता योगेश थोरात यांच्याजवळ माहिती घेतली असता चोरटी वाळू कशी चालेल, वाळू वापरल्याचे बिल संबंधित ठेकेदाराने लावणे आवश्यक आहे. तसेच काळ्या वाळूला बंदी असल्याने त्याऐवजी क्रश वाळू वापरली तरी चालेल. ग्रिट वापरणे योग्य नाही यामुळे ठेकेदाराने क्रश वाळू वापरून काम करावे.
चोरट्या वाळूचे बिल लावणार कसे.?
दरम्यान ठेकेदाराने आपण याची तहसील कार्यालयामध्ये रॉयल्टी भरून घेणार असे शासकीय विभागात सांगितले आहे. मात्र चोरट्या वाळूला महसूल विभाग रॉयल्टी लावणार कशी चोरल्याची कारवाई करून ही नियमित रॉयल्टी लावणार असा सवाल केला जात आहे.