गुहागर – गुहागर तालुक्यातील मुंढर येथे श्री स्वयंभू सोमेश्वर मुंढर या संघातर्फे 2 दिवशीय ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आल होत.या स्पर्धेमध्ये एकूण वीस संघांचा सहभाग झाला होता त्यात यश घोणसेपाटील यांचा श्री पद्मावतीदेवी हा संघ अजिंक्य राहिला असून कोतळूक साई 11 हा संघ उपविजेता ठरला.
गुहागर तालुक्यातील मुंढर येथील श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर या शाळेच्या मागील मैदानावर स्वयम् निकम व अवधूत पावरी यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेमध्ये गुहागर तसेच चिपळूण तालुक्यातील नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेमध्ये अंतिम सामना हा श्री पद्मावतीदेवी संघ विरुद्ध साई इलेव्हन या दोन संघांमध्ये पार पडला अतिशय अटीतटीच्या या सामन्यात श्री पद्मावतीदेवी संघ विजयी झाला विजयी संघाला मुंढर गावचे माजी सरपंच तसेच शिवसेना उप तालुका प्रमुख सुशील उर्फ बबलू आग्रे यांच्या हस्ते रोख 7007 रू व चषक देण्यात आल तर उपविजयी संघाला महेश उर्फ मुन्ना तावडे यांच्या हस्ते रोख 5005 व चषक देण्यात आल.उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुजल चव्हाण तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मयूर आरेकर याला चषक देऊन गौरविण्यात आल तसेच पूर्ण दोन दिवसाच्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या फलंदाजीने व गोलंदाजीने छाप पाडली तो म्हणजे कौंढर गावचा सुपुत्र श्रेयस राहाटे हा सामनावीर चा मानकरी ठरला.
या स्पर्धा पार पडाव्या म्हणून स्वप्नील आग्रे, अवधूत पावरी,स्वप्नील जाधव, स्वरीत निकम,स्वयम् निकम,अनिल गावडे,वेदांत गावडे,मनीष आग्रे,सुवर्ण आग्रे,साहिल आग्रे,प्रतीक आग्रे,निकेतन रामाने,सोहम आग्रे,बंटी आग्रे,पंकज गावडे,आदित्य गावडे,तेजस आग्रे आदींनी अथक मेहनत घेऊन या स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या.