गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर येथे प्रगती टाइम्स या साप्ताहिकाच्या वतीने भव्य दिव्य अशा नाईट अंडर आर्म ( टर्फ) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये पालशेत संघ अजिंक्य राहिला असून उपविजेता संघ वेळंब राहिला.

गुहागर चिपळूण मार्गावरील गिमवी झोंबडीफाटा येथे रमीझ लालू यांच्या मालकीच्या नाईट अंडर आर्म ( टर्फ) या खेळाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम सामना झोलाई यंगस्टार पालशेत व श्री हनुमान वेळंब या दोन संघांमध्ये पार पडला अतिशय अटीतटीच्या सामन्यात पालशेत संघ विजयी झाला विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख व चषक देण्यात आला. तर उपविजेत्या संघाला तीन हजार रुपये रोख व चषक देण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून आदित्य झगडे तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रवीण याला पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी झोंबडी उपसरपंच अजय सकपाळ यांनी प्रथम पारितोषिक रोख स्वरूपात दिले. तर या स्पर्धा पार पाडाव्यात म्हणून भाई तावडे, पप्पू चव्हाण, लतीश साळगावकर, यश घोणसेपाटील अनिल मदने, वैभव जाधव, पार्थ चव्हाण, हर्षल चव्हाण, आदित्य झगडे स्मित चव्हाण, स्वयंम निकम, स्वरीत निकम आदींनी मेहनत घेऊन या स्पर्धेत यशस्वीरित्या पार पाडल्या.