गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षातून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होते.
गुहागर बाजार शृंगारतळी येथून गाड्यांचा सर्व ताफा गुहागरच्या दिशेने गेला. गुहागर शिवाजी चौक येथे गेल्यानंतर . रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवे फेटे आणि गळ्यात धनुष्यबाण निशाणी असलेले पट्टे घालून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उमेदवार राजेश बेंडल यांनी पुष्पा अर्पण केला आणि एकच जल्लोष झाला. रॅलीमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणत होता.
कुणबी समाजातील राजेश बेंडल यांना उमेदवारी शिवसेनेने दिल्यामुळे सर्व सर्वांनाच आनंद झाला असून या वेळेला काही करू पण गुहागर विधान सभेतून राजेश बेंडल यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. जीवाचे रान करून आलेली संधी न गमावता एक दिलाने आणि एक मताने काम करू असा विश्वास सुद्धा यावेळी सगळ्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, यशवंत बाईत, शिवसेना पदाधिकारी, त्यानंतर समाजाचे रामचंद्र हुमने, तुकाराम निवाते, कुणबी संघाचे सरचिटणीस कृष्णा वने, आणि खेड, चिपळूण आणि गुहागर कुणबी संघ शाखा पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.