गुहागर ; या मतदारसंघातून या आमदार पुत्रांनी भरला उमेदवारी अर्ज… चर्चेला उधान

0
1163
बातम्या शेअर करा

गुहागर – विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय घडेल..? याचा काही नेम नाही. त्याचे झाले असे की गुहागर विधानसभा मतदारसंघातून आज आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी सुद्धा फॉर्म भरला त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांची पुढची रणनीती काय..? आणि कशी असेल यावर सध्या संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात एकच चर्चा सुरू आहे.

गुहागर ; हे इच्छुक उमेदवार आमदारकीची निवडणूक लढणार की नाही.. की फक्त हवाच करणार…!

गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर महायुतीकडून ही जागा कोण लढणार यावरून अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढवले गेले. मात्र आज अखेर उदय सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्याचप्रमाणे मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला आणी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनीही उमेदवारी अर्ज भरला. विक्रांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरताच गुहागरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच चर्चेला उधाण आले विक्रांत जाधव यांच्या उमेदवारी अर्ज मागे भास्कर जाधव यांची रणनीती काय..? यावर आता चर्चा रंगू लागल्यात विक्रांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज का भरला..? विक्रांत जाधव उमेदवारी अर्ज माघार घेणार का.? का किंवा भविष्यातील अशी कोणती रणनीती आखून भास्कर जाधव यांनी आपले पुत्र विक्रांत जाधव यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले याबाबत सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह गुहागर तालुक्यात एकच चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या काही दिवसातच गुहागर विधानसभा मतदारसंघातून विक्रांत जाधव किंवा भास्कर जाधव यापैकी नक्की कोण .? उमेदवार असणार हे समजणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here