गुहागर ; मनसे नेते प्रमोद गांधी यांनी बिग बॉस फेम विजेते शिव ठाकरेच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

0
463
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रमोद गांधी यांनी बिग बॉस फेम विजेता शिव ठाकरे याच्या उपस्थितीत रॅली काढत उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे आज दिवसभर प्रमोद गांधी आणि शिव ठाकरे यांची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यासह जिल्ह्यात होती.

राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. त्यातच गुहागर विधानसभा मतदारसंघात गेली दोन वर्ष प्रमोद गांधी हे चांगल्या प्रकारे नागरिकांच्या संपर्कात असून समाजसेवेचे कामही करत आहेत. त्याच कामाची पोचपावती म्हणून राज ठाकरे यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून प्रमोद गांधी यांना उमेदवारी जाहीर केली. प्रमोद गांधी यांनी आज आपल्या शृंगारतळी येथील कार्यालयातून भव्य दिव्य अशी रॅली काढत गुहागर येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरला या रॅलीमध्ये बिग बॉस फेम विजेता शिव ठाकरे हे प्रमुख आकर्षण होतं. या रॅलीमध्ये प्रमोद गांधी यांच्या समवेत मनसेचे वैभव खेडेकर संतोष नलावडे, विनोद जानवळकर सुनील हळदणकर, अविनाश सौंडकर ,नीलेश बामणे, विश्वनाथ डोळस, नवनाथ साखरकर, प्रसाद कुस्टे ,अनामिका हळदणकर, विभावरी जानवळकर यांच्या समवेत अनेक मनसैनिक आणि अनेक नागरिक उपस्थित होते. आगामी काळात प्रचाराला जसा जसा रंग चढेल तसा तसा मनसे विरोधकांना किती धोकादायक आहे. हे लोकांना कळू लागेल असे काही राजकीय राजकीय जाणकारांकडून चर्चिले जात आहे. प्रमोद गांधी आणि त्यांच्या सहकार्याची रणनीती पाहता सध्यातरी भास्कर जाधव यांना पर्यायी उमेदवार म्हणून प्रमोद गांधी यांच्याकडे पाहिले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here