गुहागर – ( प्रगती टाइम्स विशेष ) – राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना गुहागर विधानसभा मतदारसंघात मात्र अद्याप महायुतीचा उमेदवारच ठरत नसल्याने एकच चर्चेचा विषय ठरला. आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारीवर दावेदारी सांगितली आहे.मात्र त्याच उमेदवारीवरून सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मात्र तणाव आणि संताप व्यक्त केला जातो. आणि त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा प्रवेश करून घेतला तो मंत्री उदय सामंत यांनी मात्र यावेळी ना गुहागर तालुकाध्यक्ष हजर होते ना .. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष हजर होते. त्याचवेळी हा पक्षप्रवेश अनेकांना रुचला की नाही याबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर मागील दोन दिवसापासून राजेश बेंडल यांच्या उमेदवारीच्या विरोधात संपूर्ण गुहागर विधानसभा मतदारसंघ आणि गुहागर तालुक्यात विरोध केला जात आहे. कारण या मतदारसंघातून फक्त शिवसैनिकच निवडणूक लढेल असे उदय सामंत यांनी सांगितले होते. मात्र आत्ता दुसऱ्या पक्षातून आलेल्या एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही उमेदवारी देऊन आमच्यावर लादणार असाल तर आमचा त्याला विरोध असेल असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी नुकतेच जे पक्ष निरीक्षक रवींद्र फाटक आले होते. त्यांच्यासमोर स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता जर महायुतीने राजेश बेंडल यांना तिकीट दिले तर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार का..? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा होतोय. उमेदवारी जाहीर होण्याआधीच जर राजेश बेंडल यांना हा विरोध होत असेल तर त्याचा संपूर्ण फायदा हा या निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांना होईल… हे मात्र तेवढेच खरं ..या सर्व कारणांमुळे गुहागर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अद्याप ठरल्या नसल्याचे चर्चा सध्या नाक्या नाक्यावर सुरू आहे.