गुहागर – गुहागर आगरातून लांब पल्याची गुहागर – अक्कलकोट एस.टी. बस दीड वर्ष बंद होती. स्वामी भक्तांची व प्रवाशांची एस.टी बस फेरा सुरू करा, अशी मागणी होती. गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी २५ ऑक्टोबर पासून गुहागर अक्कलकोट एस.टी सूरू केली आहे.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुहागर- तुळजापूर बस सेवेचा प्रारंभ
ही बस सकाळी ७.३० गुहागर आगरातून सुटणार, अक्कलकोट येथे संध्याकाळी पोहाचेल, तर अक्कलकोट येथून सकाळी ६ वाजता सुटणार, ती संध्याकाळी ८.३० वाजता गुहागरला पोहोचणार. ही बस कराड ,विटा ,आटपाडी ,पंढरपूर ,सोलापूर मार्गे जाणार आहे.या एस.टी बस फेरी सुरू केल्याबद्दल सर्व प्रवासी वर्गातील त्यांच्या अभिनंदन करण्यात येत आहे