गुहागर ; हे इच्छुक उमेदवार आमदारकीची निवडणूक लढणार की नाही.. की फक्त हवाच करणार…!

0
834
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यभरात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच गुहागर विधानसभा मतदारसंघात अनेकांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मी निवडणूक लढवणार.. मी इच्छुक अशा अनेक मुलाखती दिल्या होत्या. मात्र सध्यातरी काहीजणांच्या मुलाखती ह्या फक्त हवाच ठरल्याची चर्चा गुहागर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण गुहागर तालुका ,चिपळूण तालुक्यातील 72 गाव आणि खेड तालुक्यातील काही भाग येतो या संपूर्ण भागातून अनेक जण विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे पत्रकारांसमोर मुलाखती देऊन सांगत होते. मात्र आता फॉर्म भरण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सुद्धा घेतले आहेत मात्र असे असले तरी अनेकांनी आपण निवडणूक लढवणार की नाही.? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे निवडणूक लागण्याआधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद तसेच आम्ही निवडणूक लढवणार या घोषणा फक्त हवेतच विरताच की काय..? अशी शक्यता त्या निमित्ताने पुढे आली आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी या गुहागर विधानसभा मतदारसंघात पुढील प्रमाणे राजकीय नेत्यांनी आम्ही निवडणूक लढणार किंवा आम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहोत किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी आग्रह करत किंवा सोशल मीडियावर आम्ही निवडणूक लढवणारच आमच् ठरलंय अशाप्रकारे प्रचार करत आहेत. अशा काही राजकीय नेत्यांची नावे पुढीलप्रमाणे …गुहागर भाजप तालुकाध्यक्ष – निलेश सुर्वे
बळीराजा सेना जिल्हाध्यक्ष – पराग कांबळे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष- संतोष जैतापकर सामाजिक कार्यकर्ते – सुशील अवेरे ,कुणबी सेनेचे संघटक – शरद शिगवण,संदीप फडकले .. माजी मनसे पदाधिकारी हे सर्व इच्छुक उमेदवार आगामी काही दिवसातच निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट होईल. किंवा चर्चेत राहण्यासाठी यांनी ही हवा केली होती की काय हे स्पष्ट होईल. 27 तारखेपर्यंत यामधील कोणत्याही इच्छुक उमेदवाराने अर्ज भरलेला नव्हता.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here