गुहागर – भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला

0
413
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुहागर येथे आज उमेदवार भास्करराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आज सकाळपासूनच शृंगारतळी बाजारपेठ कार्यकर्ते एकत्र येत होते आणि बघता बघता मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले चिपळूण तालुक्यातून घोषणा देत जेव्हा शिवसैनिक आले तेव्हा शृंगारतळी येथे जमलेल्या शिवसैनीकांनी “भास्करराव आगे बढो हम तुम्हारे साथ है “अशा घोषणा देण्यास सुरुवात केली त्यानंतर हा ताफा गुहागरकडे रवाना झाला. गुहागर शहरात शिवसैनिक पोहोचल्यानंतर एकच आवाज शहरात घुमला.

आमदार भास्कर जाधव यांनी प्रथम गुहागर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने आपल्या गुहागर येथील कार्यालयाजवळ आल्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत व्याडेश्वराचे सहपत्नी दर्शन घेतले. तिथून काही मोजक्याच कार्यकर्त्यां समवेत आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तहसील कार्यालय येथे जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सुवर्णाताई जाधव, मुलगा समीर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, आरपीआयचे सुभाष मोहिते आधी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here