वाई – (प्रविण गाडे )- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फाँर्म दिला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून डॉ. नितीन सावंत यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली आहे. डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. वाई विधानसभा मतदारसंघात महायुती तर्फे राष्ट्रवादी अजित पवारांकडून विद्यमान मकरंद पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटे की टक्कर लढत होण्याची श्यक्यता आहे.