गुहागर विधानसभा मतदारसंघ ; ठाकरेंचा वाघ मैदानात पण महायुतीचा अजून उमेदवारच ठरेना !

0
401
बातम्या शेअर करा

गुहागर – विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, पण गुहागर विधानसभा मतदारसंघात चित्र काही वेगळंच आहे ! शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी अंगाला तेल लावून कुस्ती खेळण्यास सज्ज आहेत. त्यांनी जोरदार तयारी केली आहे, पण महायुतीचा उमेदवार गायब असल्याने भास्कर जाधव यांच्या समोर खेळणारा प्रतिस्पर्धा मिळेना! त्यांची अवस्था अशी झाली आहे की, “मैदानात आलोय, पण कुस्ती कोणाशी करायची?”

भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती मात्र अजूनही उमेदवार ठरवण्याच्या चक्रव्यूहात अडकलेली दिसते. भाजपकडून माजी आमदार विनय नातू उत्साहात आहेत, पण महायुतीच्या गोटात या जागेवर बसण्याची “अस्सल कुस्ती” सुरु आहे. शिवसेना (शिंदे गट) मध्येही अनेक धडाडीचे कार्यकर्ते इच्छुक आहेत, पण त्यांचं अजून ‘गादी’वर बसणं बाकीचं आहे.


महायुतीतला गोंधळ इतका वाढला आहे की, माजी आमदार विनय नातू यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण ही केली आहे. तर नुकतेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून आलेले नगराध्यक्ष राजेश बेंडल यांची अवस्था अजून गोंधळलेली आहे. ते राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत आलेत, पण उमेदवारीचं गणित अजूनही जुळून येत नाही!

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने वेळ कमी आहे. तरीही महायुतीचा उमेदवार ठरत नाही, त्यामुळं भास्कर जाधव यांच्या प्रचारकांनी मात्र बॅनरबाजी सुरु केली आहे – “क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में! वनसाईड सुवर्ण- भास्कर पर्व!”


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here