गुहागर – गुहागर -चिपळूण मार्गावरील उमरोली येथे झाला भीषण असा अपघात या अपघातात दुचाकी वरील दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
गुहागर- चिपळूण मार्गावर गुहागर कडून चिपळूण कडे जाणाऱ्या एका भंगार वाहतूक करणारे ट्रक ने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले असून अपघात ग्रस्त ट्रकला आग लागली आहे.मात्र ही आग हा अपघात झाल्याने स्थानिक नागरिकांनी लावल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक माहिती पोलीस घेत आहेत.