बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर-विजापूर महामार्ग भूसंपादनात जमीन मालकांना
मोबदला मिळणार असल्याच्या नोटीसा चिपळूण-मार्गावरील जमीन मालकांना संबंधित गावांच्या तलाठ्यांकडून देण्यात येत आहेत. या नोटीसा नेण्यासाठी स्थानिक जमिनदारांबरोबरच ज्या माहेरवाशिणींची नावे आहेत त्यांनाही माहेरातून बोलावण्यात येत आहे. त्यामुळे माहेरवाशिणींची नोटीसा मिळविण्यासाठी धावाधाव सुरु आहे.

गुहागर-विजापूर महामार्ग भूसंपादन करण्यात आले. चिपळूण –गुहागर मार्गावरील अनेकांच्या जमिनी रस्त्यालगतच्या यामध्ये गेलेल्या आहेत. या सर्व जमीनमालकांच्या मोबदल्याबाबत शासन स्तरावरुन निर्णय झाल्यावर याबाबतच्या नोटीसा महसूल विभागामार्फत संबंधित तलाठी कार्यालयांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. जमिनीच्या उताऱ्यावर ज्यांची नावे आहेत या सर्व जमीनमालक, सहहिस्सेदार यांना त्यांच्या नावे स्वतंत्र नोटीसा काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यामध्ये सर्वाधिक माहेरवाशिणींची नावे आहेत.नोटीसा स्वीकारण्यासाठी संबंधित नावाचीच व्यक्ती लागत असल्याने जमीनमालकांना माहेरवाशिणींनी नोटीसा ताब्यात घेण्यासाठी आपल्या माहेरी आमंत्रित करावे लागत आहे.

यामध्ये महत्वाचे म्हणजे अनेक माहेरवाशिणींची नावे उताराऱ्यामध्येच
चुकीची असल्याने त्यांची मोठी धावपळ उडाली आहे. उताऱ्यावर भावांची नावे बरोबर असली तरी अनेक माहेरवाशिणींची नावे आडनाव सासरवाडीचे तर नाव माहेरचे अशापध्दतीने चुका आढळून येत आहेत. त्यामुळे मूळ उताऱ्यावर नावात बदल करण्यासाठी माहेरवाशीणींना आपले सरकार सेवा केंद्रात जावून अँफ्युटेड व गँझेट करुन घ्यावे लागत आहे. त्यामुळे सेवा केंद्रात एकच गर्दी उसळलेली
दिसून येत आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर संबंधित तालुक्याच्या तहसिलला जाऊन पुन्हा तेथे अँप्युटेड करुन गँझेट सादर करावे लागणार आहे. त्यानंतर मूळ उताऱ्यातील नावात बदल होणार आहे.

ही सर्व प्रक्रिया झाल्यावर चिपळूण प्रांत कार्यालयात जाऊन तेथेही ही
सर्व कागदपत्रे स्वतःहून सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे अनेक
माहेरवाशिणींची धावाधाव सुरु आहे. अनेक माहेरवाशिण मुंबई, पुणेसारख्या शहरांमधून नोटीसा नेण्यासाठी माहेरी आल्या मात्र, त्यांचा यासाठी मुक्काम वाढलेला दिसून येत आहे. दुसरीकडे मोबदला कधी मिळणार याबाबत अनभिज्ञताच आहे. ‘सरकारी काम वर्षभर थांब’ असे तर होणार नाही ना असाही प्रश्न अनेक जमीनमालक, माहेरवाशिणींना पडला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here