चिपळूण – गुहागर चिपळूण मार्गावरील गणेशखिंड येथील रस्त्याच्या जवळील भाताच्या खाचराच्या कॅनव्हासवर सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने बनवलेला भाताच्या रोपांचा हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाचाडचे माजी सरपंच बारकू खोपडे यांच्या शेतात शेत नांगरून पेरणी करतानाच हत्तीच्या आकारात पेरणी करण्यात आली असून हत्ती रेखाटण्याचे काम चिपळूणचे कलाकार संतोष केतकर यांनी केले आहे. भात रुजून वरती आल्यावर इतर भागात लाल माठ भाजी पेरण्यात आली आहे. याचा उद्देश एकच आहे की, ग्रामीण लोकांचे शहराकडील स्थलांतर या कलाकृतीच्या माध्यमातून पर्यटन वाढून थांबावे. ही कलाकृती साकारण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते राम मोने, भाऊ काटदरे, नितीन नार्वेकर, गजानन सुर्वे, सागर रेडीज, राजेंद्र हुमरे, सोहम घोरपडे, निकेत नार्वेकर यांनी परिश्रम घेतले.