चिपळूण ; नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पत्रकार सतीश कदम ही भूमिका घेणार ?

0
128
बातम्या शेअर करा

चिपळूण – लक्ष्मीकांत घोणसेपाटील

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा चिपळूण नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालेले असतानाच आता याच ठिकाणी चिपळूण मधील ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम या निवडणुकीत आपली काय भूमिका घेणार याची चर्चा सध्या संपूर्ण चिपळूण शहरात सुरू आहे.

चिपळूण नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटासाठी आरक्षण झाल्यापासून अनेकांनी पत्रकार सतीश कदम यांनी निवडणूक लढवावी व एक नवीन चेहरा मतदारांसमोर ठेवावा अशी मागणी अनेक स्तरातून केली. मात्र निवडणूक जाहीर झाली फॉर्म भरण्यास सुरुवात झाली मात्र असे असले तरी अद्यापही सतीश कदम यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे पत्रकार सतीश कदम या निवडणुकीत नक्की कोणती भूमिका घेणार.? किंवा कोणत्या राजकीय पक्षाशी संधान बांधून त्या पक्षाकडून निवडणूक लढवणार..? की अपक्ष निवडणूक लढवणार.? याबाबत चिपळूण शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहेत.

पत्रकार सतीश कदम हे गेले अनेक वर्ष चिपळूण शहरातील नागरिकांशी पत्रकारितेच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यांनी याआधी या शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयावर सडेतोड लिखाणही केले आहे. त्यातच 2021 मध्ये चिपळूण शहरांमध्ये महापूर आला होता त्या महापुराच्या वेळी त्यांनी बचाव समितीमध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. ती भूमिका अद्यापही नागरिकांच्या मनात आहे. तसेच शहरातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या बरोबर ,राजकीय नेत्यांबरोबर ,सर्वसामान्य माणसांबरोबर, व्यापाऱ्यांबरोबर, त्यांच्या संबंधही चांगले आहेत. अभ्यासू नगराध्यक्ष चिपळूण शहराला मिळावा यासाठी अनेकांनी त्यांनी निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी केली आहे. मात्र सतीश कदम यांनी अध्याप आपली भूमिका जाहीर केली नसल्याने ते नक्की कोणती भूमिका घेणार याकडेच संपूर्ण चिपळूण वासियांचं लक्ष लागून राहिले आहे.

नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत आपण निवडणूक लढवणार का.? याबाबत पत्रकार सतीश कदम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी प्रगती टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले की येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला माझा निर्णय कळेल असे म्हणून त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here