गणपती स्पेशल दिवा-चिपळूण डेमू ट्रेन सुरू..

0
132
बातम्या शेअर करा

चिपळूण – गणेशभक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर दिवा ते चिपळूण दरम्यान डेमू सुरू करण्यात आली आहे. या डेमू गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज दिवा रेल्वेस्थानकातून ही गाडी चिपळूणकडे निघणार आहे.

१ सप्टेंबरपासून दिवा-चिपळूण डेमू ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दिवा स्थानकातून दररोज सकाळी ७ वा. ती चिपळूणच्या दिशेने निघेल व सर्व थांबे घेत ती दुपारी २ वाजेपर्यंत चिपळूण रेल्वे स्थानकात पोहोचेल. यानंतर दु. ३ वा. पुन्हा चिपळूणहून दिव्याकडे जायला निघेल.चिपळूण, खेडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केली आहे. यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि मे महिन्यामध्ये चिपळुणातील चाकरमान्यांची परवड होते. कोकण रेल्वेमधून उभ्यानेच येथील लोकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून चिपळूण ते दिवा अशी खास गणपती स्पेशल डेमू ट्रेन सुरू करण्यात आली आहे.या गाडीचा फायदा खेड परिसरातील दापोली, मंडणगड व पोलादपूर येथील लोकांना होणार आहे. या डेमू ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here