चिपळूण – सकाळी सहा वाजता अचानक चिपळूण आगारात उभी असलेली बस गायब झाल्याचं वाहकाच्या लक्षात येताच सर्वत्र खळबळ माजली. त्यानंतर मात्र बराच वेळ बस डेपोच्या आवारात मिळत नसल्याने ही बस चोरीला गेली याची चर्चा सुरू झाली आणि मग बघता बघता सर्वत्र शोधा शोध सुरू झाली.
होय ही घटना घडली आहे चिपळूण येथे……. सध्या कोकणात गणेशोत्सवाचा सण या निमित्त चाकरमान्यांना घेऊन अनेक जिल्ह्यातील बसेस ठीक ठिकाणी आल्या आहेत. त्यातच चिपळूणमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या बस आहेत. त्यापैकी शिवाजीनगर बस स्थानकात 200 बस उभे आहेत. तर इतर ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या कडेला आणि एसटी स्टँड परिसरात जवळपास 100 बस उभ्या आहेत.
अशावेळी नेहमी चिपळूण येथे येणारे कोल्हापूर चिपळूण ही बस चिपळूण बस स्थानकातील शिवाजीनगर या बस स्थानकात पार्किंग साठी उभी केली होती. मात्र सकाळी ज्यावेळी वाहक ही बस चिपळूण कोल्हापूर या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला त्याच्या जागेवर ही बस दिसली नाही. आणि पुढे ही बस त्या जागेवर दिसत नसल्याने चोरीला गेली याची चर्चा सुरू झाली त्यातच आगारातील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीचा फुटेज चेक केल असता ही बस या डेपोतून बाहेर पडल्याचे दिसून आले.
त्यानंतर दिवसभर या बसची चर्चा आणि शोधाशोध सुरू होती अखेर कोल्हापूर आगाराची ही बस गुहागर येथील व आगरात असल्याचं एसटीच्या कर्मचाऱ्यांना समजलं आणि त्यानंतर मात्र सगळ्यांनी शोधाशोध थांबवले अशाप्रकारे दिवसभर एक न झालेली चोरी याची चर्चा मात्र खूप खमंग स्वरूपात रंगली होती. आता एसटी प्रशासन ही बस गुहागर आगारात कशी आली.? याची चौकशी करत आहे. किंवा नजरचुकीने 300 बस पैकी ही बस कुठल्या चालकाने आणली का याची चौकशी सुरू आहे.