चिपळूण – मुंबई गोवा महामार्गालगत चिपळूण येथील वालोपे गावातील एच. पी पेट्रोल पंप येथे व्हेल माशाची उलटी तस्करी करणा-या चार इसमांना वनविभाग चिपळुण यांनी ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करुन पुढिल तपास चालू आहे.
प्रकाश तुकाराम इवलेकर, दिलीप पांडुरंग पाटील , प्रविण प्रभाकर जाधव, अनिल रामचंद्र महाडीक या आरोपीकडून व्हेल मासा उलटी (Ambergris २.८९२की.ग्रॅम) सह शाईन गाडी जप्त केली आहे. चार संशयित आरोपींच्या विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या कार्यवाहीत आर.एम रामानुजम,मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर ,गिरिजा देसाई, प्रियंका लगड, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली , आर. आर. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण), प्र. ग. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली आणि वनक्षेत्रपाल सामाजीक वनिकरणचे एम. एम डबडे, एम. व्हि. पाटील, वनपाल दापोली, पाली, वनरक्षक आदी उपस्थित होते. सदर गुन्हा प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
 
             
		
