बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण शहरातील मुंबई -गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालय समोरील परशुराम नगर येथील कॉलिटी ऑफिस इक्वीपमेंट या दुकानात अज्ञातांनी चोरी करून १० कॅमेरा, लेंन्स व २१ हजार ३६५ रुपयांच्या रोख रक्कम असा २ लाख ७९ हजार रुपयांची चोरी केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
खेर्डी माळवाडीतील अरुण कदम यांनी याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. अधिक तपास एपीआय अमरसिंह पाटील करीत आहेत.मात्र असे असले तरी लॉकडाऊन मध्ये ही चोरी झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here