गुहागर – गुहागर तालुक्यातील आरे श्रीधारदेवी मंदिराजवळील असलेल्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील ९२ हजार रूपये किंमतीच्या तब्बल २४ इन्व्हर्टर वेंटच्या चोरीचा प्रकार घडला होता. याबाबात गुहागर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी रोहित देवकर , सिद्धांत भोसले राहणार आरेगाव, विवेक मालगुंडकर, राहणार पालपेणे यांना अटक करण्यात आली आहे.
१२ ऑगस्ट रोजी तालुक्यातील आरे गावातील श्रीधारदेवी मंदिरानजीक असलेल्या की आय, जीओ आणि बीएसएनएल टॉवरचे शेल्टर रूममध्ये असलेल्या टॉवर व्हिजन इंडीया प्रा. लि. पूर्ण कंपनीकडून आलेल्या आमरराजा कंपनीच्या एकूण २४ इन्र्व्हरटर बॅटऱ्या शेल्टर रूमचा दरवाजा हत्याराने उचकटुन काढून चोरून नेल्या. सदर बॅटऱ्यांची ९२ हजार किंमत असून चोरी प्रकरणी गुहागर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी उपनिरिक्षक सुजित सोनावणे अधिक तपास करत असताना तीन संशयिताना अटक करण्यात त्यांना यश आले आहे.