चिपळूण – चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भूषण जयसिंग सावंत यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
भूषण सावंत 1991 साली पोलीस खात्यात भरती झाले त्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर ,चिपळूण, दापोली ,रत्नागिरी आदी ठिकाणी आपली कामगिरी बजावली यामध्ये रत्नागिरी येथे असताना एका बँकेमध्ये झालेली रॉबरी त्यामध्ये विशेष तपास करत त्यांनी मोठे यश मिळवले. तर देवरुख मध्ये त्यांनी अटक वॉरंट बजावून सुद्धा हजर न राहणारे आरोपींना हजर केल्याच्या अनेक घटना आहेत. त्यातच ते सध्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यरत आहेत. त्यांची आज पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येतं आहे.