गुहागर – नुकत्याच देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विधासभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे चित्र आहे. त्यातच गुहागर विधानसभा मतदारसंघात सुद्धा अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समोर येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातुन नामवंत वकील ॲड.सुशील सुगंधा गणपत अवेरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सध्या चर्चिले जात आहे.
ॲड.सुशील अवेरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार इच्छूक असले तरी त्यांनी अजूनही कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.
माञ याबाबत ॲड.सुशील अवेरे यांनी स्पष्ट करताना सांगितले आहे कि , “आमदार” पद हे सामान्य जनता आणि शासन – प्रशासन यामधील महत्वाचा दुवा असतो , आपल्या मतदार संघातील प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याचा प्रामणिक प्रयत्न करण्यासाठी अशी निवडून आलेली व्यक्ती काम करत असते. पुढील दोन महिन्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष दौरा करून गुहागर तालुका वासियांचे प्रश्न आणि त्यांची इच्छा काय आहे. तसेच सध्यस्थितीत काही राजकीय पक्षांनी देवू केलेल्या या संधीसाठी , नक्की कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार यासंधर्भातील राजकीय निर्णय लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल असे सांगितले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजून किती उमेदवार इच्छुक आहेत..? आणि कोण कोण निवडणूक लढवणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.