गुहागर ; जलजीवनच्या त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी पाणीपुरवठा विभागाची शिफारस.. आता लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे..

0
717
बातम्या शेअर करा

गुहागर – जलजीवन मिशन हा शासनाचामहत्त्वकांक्षी प्रकल्प असनुही या योजनेचा गुहागर तालुक्यात पूर्णपणे बोजवारा उढालेला दिसून येतो. तालुक्यातील योजनेचे एकूण ११२ कामांपैकी चव्हाण कन्स्ट्रक्शन / मोहन मंगलू चव्हाण या एकाच ठेकेदाराला तब्बल १७ कामे देण्यात आली आहेत. सध्या ठेकेदारांमध्ये मोठी रस्सीखेच असतानाही या कामांमधील ५ कामे अंदाजपत्रकापेक्षा १४ टक्के जादा दराने देण्यात आलेली आहेत. एकाच ठेकेदाराला १७ कामे वाटप केली असल्याने गुहागर तालुक्यात जलजीवन योजनेच्या या कामाकडे जाणून-बुजून या ठेकेदाराला दिल्याचा आरोप करण्यात येत असून सध्या या कामांचा बोजवारा उढाला आहे. या योजना आता सर्वसामान्य माणसांसाठी नसून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी आहेत की काय ? अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचे चौकशी व्हावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत.
याच ठेकेदारावर कामांचा बोजवारा वाढला असल्याने संबंधित ठेकेदाराला गुहागर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अनेक वेळा नोटीस बजावली आहेत. कामे नियोजीत वेळेत पूर्ण न झाल्याने या कामांवर ५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. तसेच वेळेत कामे पूर्ण न झाल्याने या ठेकेदारा विराधोत विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने चव्हाण कन्स्ट्रक्शन / मोहन मंगलू चव्हाण या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. आता याबाबत प्रशासन नक्की काय भूमिका घेते याची चर्चा सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. तर काहीजण प्रशासन काहीच भूमिका घेणार नाही कारण यामध्ये सगळ्यांचेच हात ओले झाले आहेत याची चर्चा नाक्या नाक्यावर करताना दिसत आहेत.

उपअभियंता गुहागर ग्रामीण पाणी पुरवठा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ च्या पत्राने लेखी स्वरुपात केलेली आहे. असे असले तरी या संबंधित ठेकेदाराला आज तारखेपर्यंत २ कोटी ५४ लाख ३७ हजार ४६९ रुपयांचे बिल अदा करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकीकडे काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव देऊन तो प्रस्ताव बासनात गुंडाळून त्याला बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे.

जलजीवनच्या ११२ कामांपैकी १७ कामांचे ठेकेदार मोहन मंगलू चव्हाण या ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण न करणे लोकप्रतिनिधी व गावातील ग्रामस्थांकडे अरेरावी व अर्वच भाषा वापरणे अशा अनेक तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर या ठेकेदाराला दिनांक २७ मे २०२४ रोजी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गुहागर यांनी नोटीस बजावून मुदतीत काम पूर्ण करण्याच्या व आपल्या वगणूकीत सुधारणा करण्याच्या सूचना तसेच विविध विषयाला धरून नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. या ठेकेदाराची मशीनद्वारे चर मारणे, पाईप टाकणे व बिले काढणे अशाच पद्धतीची अनेक ठिकाणी कामे सुरु असल्याने याबाबत तालुक्यातील जागृक नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकारण या कार्यालयाकडे तसेच लोकप्रतिनिधीकडे लेखी स्वरुपात तक्रार केली असल्याचे समजते. तसेच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी शिफारस झाल्याने या ठेकेदारावर योग्यती कारवाई तातडीने करावी अशी मागणी गुहागर तालुक्यातील जनतेच्या वतीने केली जात आहे.

वारंवार नोटीसा दिल्या – छत्रे

चव्हाण कन्स्ट्रक्शन / मोहन मंगलू चव्हाण या ठेकेदाराकडे तालुक्यातील १७ जलजीवन मिशनची कामे आहेत. ठेकेदार मुदतीत कामे पूर्ण करीत नाहीत, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने पाणी पुरवठा विभागाने या ठेकेदाराला अनेक नोटीसा बजावल्या आहेत. काम मुदतीत पूर्ण न झाल्याने या कामांच्या मुदतवाढीसाठी ५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. तसेच नोटीस देवूनही कामे वेळेत होत नसल्याने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे करण्यात आली आहे. तसेच ठेकेदाराला अदा केलेली बिले वरीष्ठ अधिकाऱ्याच्या सुचनेप्रमाणे अदा करण्यात आली आहेत अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उपअभियंता मंदार छत्रे यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here