बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पिंपर येथे आज अतिशय धक्कादायक अशी घटना घडली. नदीच्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करतानाचा मोह अंगाशी आला आणि त्याच्यात एकाचा दुर्दैवीरीत्या अंत झाला या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोक काळा पसरली असून सध्या गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.

पिंपर येथील मठवाडी मधील दोघेजण हे नदीवर मासेमारीसाठी गेले होते. यावेळी नदीतील मासे लवकरात लवकर पकडण्यासाठी नदी शेजारी असणाऱ्या इलेक्ट्रिक पोलवर अनधिकृत पणे वायर टाकून विजेचा प्रवाह नदीतील पाण्यात सोडला याच वेळी या दोघांमधील संदेश दवंडे या व्यक्तीला पाण्यात करंट सोडल्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा स्पर्श झाल्याने तात्काळ विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला तर दुसरा मुकेश नामक व्यक्ती हा त्याला वाचवताना जखमी झाला. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली असताना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या दोन व्यक्तींना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले यावेळी संदेश दवंडे हा मयत झाला असून दुसऱ्या जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल वांगणकर व गुहागर पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here