गुहागर ; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, तीन तासापासून लहान मुले लसीकरणासाठी बसले ताटकळत….

0
495
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर येथे आज शासकीय लसीकरणाचा कार्यक्रम असताना सकाळी नऊ वाजल्यापासून तीन गावातील ग्रामस्थ एकत्र जमले आहेत हे ग्रामस्थ आपल्या लहान बाळांना घेऊन लसीकरणासाठी एकत्र जमले आहेत. मात्र गेल्या तीन तासापासून आरोग्य विभागाचा लस घेऊन येणारा आरोग्य कर्मचारी अद्याप या ठिकाणी न आल्याने सर्वच लहान मुलांचे आणि त्यांच्या पालकांची दयनीय अवस्था झाली… याबाबत तळवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता आरोग्य कर्मचारी दोन तासापूर्वीच लस घेऊन गेल्याची माहिती दिली मात्र असं असताना अद्याप देवघर या ठिकाणी लस का आली नाही याचं कारण मात्र समजू शकलेले नाही.. कामात हलगर्जीपणा करून नागरिकांना वेठीस धरणार्या या कर्मचाऱ्यावर आता आरोग्य विभाग काय कारवाई करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले.

दोन तासापासून या ठिकाणी लहान मुल व त्यांचे पालक लसीकरणासाठी बसलेले आहेत त्यांना लस येणार आहे की नाही… याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही आणि या ठिकाणी असलेले आरोग्य कर्मचारी लस येणार असं सांगत आहे. त्यामुळे नक्की लसीकरण होणार की नाही असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला. तर झोंबडीच्या महिला उपसरपंच यांनी या बाबत संताप व्यक्त केला असून या बाबत आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here