चिपळूण ; उमरोली येथील देवी निंगुबाई भैरी बसली १ हजार १ नारळाच्या आसनावर

0
100
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील उमरोली येथील ग्रामदेवता नींगुबाई, भैरिदेवी यांचा शिमगा उत्सव सुरू असून भोवणीसाठी पालखी गावातील वाड्यांवरती फिरत आहे. अरमरेवाडी येथील दिलीप अरमरे यांच्या निवासस्थानी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी पालखीचे आगमन झाले असता त्यांनी देवीला केलेला नवस फेडण्यासाठी देवीची पालखी १ हजार १ नारळाचे देवीला आसन करून त्यावर ग्रामदेवता निंगुबाई भैरी देवीची पालखी विराजमान झाली होती.


कुलदेवता आणि ग्रामदेवता ही दोन देवस्थान प्रत्येकाचे श्रद्धास्थान असतात आपापल्या मनातील मनोकामना इच्छा आपल्या या दोन्ही देवस्थानाकडे भक्त व्यक्त करतात. त्या पूर्ण झाल्या की जी नवस केला आहे ती फेडला जातो. अशी आजही प्रथा सुरू आहे. सध्या शिमगा उत्सव सुरू आहे. या उत्सवात सुद्धा ग्रामदेवता घरी आल्यानंतर गावकरी देवीला नवस रूपाने आपले गाऱ्हाणे घालतात. जर हे गाऱ्हाणे देवीने पूर्ण केले तर बोललेला नवस देवीच्या चरणी अर्पण केला जातो. असाच एक आगळावेगळा नवस तालुक्यातील उमरोली अरमरेवाडी येथील दिलीप अरमरे यांनी आपला मुलगा गौरव दिलीप अरमरे याला चांगली नोकरी लागावी म्हणून केला होता. नोकरी लागली तर मी एक हजार एक नारळ तुझ्या चरणी अर्पण करून त्यावर तुला विराजमान करेन. असा नवस केला होता. आणि तो नवस ग्रामदेवता निंगुबाई. भैरीदेवीने पूर्ण केल्यामुळे ६ रोजी त्यांच्या घरी ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन झाले तेव्हा पालखी एक हजार एक नारळावरती विराजमान करण्यात आली. हा आगळा वेगळा नवस देवीचा त्यांनी फेडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आपले गाऱ्हाणे देवीने पूर्ण केले त्याचा आनंद दिसत होता. हे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. आपली जर देवीवर मनापासून श्रद्धा असेल तर आपली मनोकामना नक्की पूर्ण होते याची प्रचिती आली आहे. त्यामुळे सर्वांनीच मातेचा जयघोष करत पालखी नाचवत आपला आनंद व्यक्त केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here