गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या 5 जणांना शिकारी करण्याच्या साहित्यासह गुहागर पोलिसांनी ताब्यात घागर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
शृंगारतळी येथील चेक पोस्ट येथे गुहागर पोलीसांनी नाकाबंदी करत असताना अभिजित विजय शेटे (41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32) रा. कांदिवली) जोगेश शंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32) रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन त्याची तपासणी करतात त्या गाडीमध्ये एक 12 बोर बंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरी आढळून आल्या याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली. गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे 135 भारतीय कलम 188 आय पिसि कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत. सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.