गुहागर; समुद्रकिनाऱ्यावरील सीव्हय़ू गॅलरी तीन आठवडय़ात पाडा

0
696
बातम्या शेअर करा

गुहागर – सीआरझेड एक  मध्ये परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या गुहागर किनाऱयावरील तीन सीव्हय़ू गॅलरी तीन आठवडय़ात पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिवांनी आवश्यक ती चौकशी करून कार्यवाही करावी अशा सूचनाही न्यायाधिकरणाने दिल्या आहेत.  तसेच अवैध गॅलरी उभारण्यासाठी आलेला खर्च संबंधित व्यक्ती, अधिकारी यांच्याकडून वसूल करून तो सरकारी तिजोरीत जमा करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

गुहागर मधील समुद्रकिनारी उभारण्यात आलेली फ्लोटींग जेटी व सीव्हय़ू गॅलरीची उभारणी करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करत  शहरातील बळवंत परचुरे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे  याबाबतचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी याअगोदरच फ्लोटींग जेटी काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. नव्या आदेशात समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या तीन सीव्हय़ू गॅलरी पाडून तेथील जागा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी तीन आठवडय़ाचा कालावधी देण्यात आला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here